Saturday, August 19, 2017

शंभू चरित्रं भाग :- ११

Image may contain: 7 people, indoor

३ एप्रिल १६८० शिवरायांच निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते रायगडावर न्हवते याच कारण! ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत अडकले होते. राजारामाचं लग्नं ते स्वारीत असतानाच झालं. म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत वगैरे अजिबात न्हवते. हि वस्तुस्थिती आहे. आणि शिवरायांच निधन झाल्यावरं शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तरं रायतेतं गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमणं करायची भीती आहे. म्हणून शिवरायांच्या निधनाची वार्तासुद्धा गोपनीय ठेवण्यात आली. पण! त्याचवेळी मंत्री रायगडावर जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरु झाला. कसंही झालं संभाजीराजे गादीवर येत उपयोगाचे नाहीत. कारण! संभाजीराजे "धर्मपंडित", "संभाजी संस्कृत चे ज्ञानी", "संभाजी निर्णय क्षमता असणारे", "संभाजी प्रचंड बुद्धिमान", "संभाजी प्रचंड शौर्यशाली". संभाजी जरं गादीवर आले तरं अत्ताच ते आपला मुलायजा ठेवत नाहीत, पुन्हा तरं आपल्यालाच ठेवणार नाहीत. त्यामुळे कसल्याही परीस्थितीत संभाजी गादीवर येत कामाच नयेत. त्यापेक्षा राजारामाला गादीवर बसवूया. राजाराम अल्पवयी आहे, त्याला कारभारं जमणार नाही म्हणजे कारभारं आपल्याच हातात येणारं. स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीला गादीवर येऊ न देण्याचा चंग बांधला. त्यासाठी सोयराबाइंना सरळ सरळ हाताशी धरलं आणि तिकडं कराडला "हंबीरराव मोहिते" जे सोयराबाइंचे सख्खे बंधू, मराठेशाहीचे सरंसेनापती, सरलष्करं, त्यांना निरोप पाठवला, पन्हाळ्यावर संभाजीला कैद करण्यास जायचयं. आपण ससैन्यं तयार रहा. त्यांची भूमिका अशी कि कुणाला वाटणारं नाही, आपला भाचा गादीवर येऊ नये. आता राजारामाला गादीवर बसवतोय म्हंटल्यावर मामा "हंबीरराव" तरं लगेच तयार होतील आणि झालंही तसंच हंबीररावांनी लगेच कळवलं "मी तयारच आहे, तुम्ही या मिळूनच संभाजीला कैद करायला जाऊ". मंत्री आनंदले, निघाले, आले. तळबीडला आले हंबीररावांच्या पुढं. चला आता सैन्यं घ्या संभाजीला कैद करायचयं. आणि त्याच क्षणी हंबीररावांनी डाव बदलला, बुंबरान त्याचं त्यांच्यावर उलटवलं. आल्या मंत्र्यांना सरळ काढण्या चढविल्या. सगळे कैद केले आणि पन्हाळ्यावर नेऊन संभाजींच्या पायावर घातले आणि कडाडले सरलष्करं..."ही घ्या नादान हरामजाद माणसं"..."राजं! जाऊन अजून अकरा दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आलेत....घ्या ताब्यात!!!" आणि मंत्री फ़िल्तोरं गिरफ्तार झाले. संभाजी राजांनी त्यांना कैदेत ठेवलं. एक महिना पन्हाळ्यावरचं कारभारं चालवला आणि मग! संभाजी रायगडावर आले.
पण! या काळात संभाजींनी हंबीररावांना विचारलं..."मामासाहेब, आपण राजारामांचे मामा असून, आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू असून आपण त्यांच्यापाठीशी उभं राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं काय उभं राहिलात?" त्यावेळी हंबीररावांनी सांगितलं, "या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच आणि मंत्री माझ्याकडे येताच सोयराबाइंनी मला कळवलं कि, कैसेही करून संभाजी राजांना वाचविणे. सोयराबाइंनी निरोप दिल्यामूळच मी आपल्याला वाचवू शकलो". दुर्दैवानं सोयराबाइंची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात "कैकैयी" सारखी करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर अन्याय झालायं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यांना भिंतीत छिलून-बिलून मारले, असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित रंगवल्यात. अजीबात नाही, सोयराबाइंना कुणीही भिंतीत छिलून मारलं नाही उलट या घटनेनंतर दीड वर्ष पुढं सोयराबाई जिवंत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. रायगडावर संभाजीराजे आले. शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले न्हवते. संभाजी राजांनी पहिल्यांदा ते करवून घेतले. रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल नऊ महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. "संभाजी राजे" स्वराज्याचे दुसरे "छत्रपती" झाले.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Thursday, August 17, 2017

शंभू चरित्रं भाग :- १०

No automatic alt text available.

"शिवाजीराजे" मोघालांचे किल्ले घेत निघाले असताना, दीलेरंखान काहीच हालचाल करेना म्हणजे त्याचे किल्ले घेत असून सुद्धा दीलेरंखान काही प्रतिकारं करत नाही. त्यामुळे तो मुआजम वैतागला आणि त्यानी दीलेरंखानाला पत्रं लिहिलं..."शिवाजी राजे" आपले किल्ले-किल्ले घेत आहेत, तू गप्प काय बसलाय!!!" तरीसुद्धा हालचाल नाही दीलेरंखानाची. आणि मग! शेवटी औरंगजेबाच पत्रं आलंय...."तू नोकर कुणाचा? माझा कि शिवाजीचा! आणि मग! दीलेरंखानाला हालचाल करणं भाग पडलं. दीलेरंखान पन्हाळ्याला आक्रमणं करायला निघाला आणि मध्ये "आसनी" ला मुक्कमं पडला. "भीमसेन सक्सेना" नावाचा इतिहासकारं लिहितो, ""शिवाजींची माणसं गुप्तंपणे संभाजीराजांकडे येत-जात असतं. एके दिवशी शिवाजी महाराजांच्या माणसांनी संभाजी राजांना बाहेर काढले. विजापुरला मह्सुद्खानाकड़े नेले आणि तिथून मग! संभाजी राजे पन्हाळ्यावरं आले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या माणसांनीच संभाजीराजांना सोडवून नेलंय, आता संभाजी जर फितूरं असते तर शिवरायं त्यांना परत कसे आणतील?. "खंडोजी खोपडा फितूरं झाला, शिवरायांनी त्याचे हात पाय तोडले". "संभाजी कावळी मोघलांना जाऊन मिळाला, प्रतापराव गुजराकर्वी त्याला ठारं मारलं". मग! शिवरायं तो न्याय संभाजीराजांना का लावत नाहीत? साधी गोष्ट आहे हि चाल शिवरायांची आहे. हे जे केलंय संभाजीराजांनी ते शिवरायांच्या इच्छेनुसारच केलंय आणि शिवरायांच्या राजकीय चाली अशाच राहिल्यात. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लुटं करून परत येतात, संभाजींच वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप घेऊन येतात. आपण अलीकडे म्हणतोच कि आजकालचे राजकारणी बोलतात एक आणि करतात एक. त्याचं राजकारणंच काही काळात नाही. आत्ताच्या राजकारण्यांच राजकराणं आम्हाला कळत नाही मग! ३५० वर्षापूर्वीच्या शिवरायांच राजकारण आम्हाला काय कळणार?
गुप्तं गोष्टी आहेत. गोपनीय भाग आहे. काही लोकं म्हणतात, "पण! आमच्याकडे पत्रं आहेत ना संभाजी राजांनी दीलेरंखानाला पाठवलेली, आम्ही तुमच्याकडे यायला आतूरलोय, आम्हाला तुमच्याकडे घ्या". आता मला एक सांगा हा जरं गुप्तं आणि गोपनीय कटाचा भाग असेल तर संभाजी राजे दीलेरंखानाला असं लिहितील का.....,"राजमान्य राजश्री दीलेरंखान साहेबांशी शीरसाष्टांग दंडवत", त्याचं काय झालं आमचे आबासाहेबं नुकतेचं कर्नाटकंवरनं परत आलेत. आमचं सैन्यं थकलंय, शस्त्रंपण नीट तयार नाहीत त्यामुळे आमचे आबासाहेब म्हंटले, आपण काय आत्ताच दिलेरंखानासोबत लढू शकत नाही, मग! संभाजी राजे करता का असं!!! जाता का दिलेरंखानाकडे जावा जरा वर्ष दीड वर्ष तिथं जाऊन त्यांना गाफील ठेवा, झाली तयारी कि आम्ही तुम्हाला कळवतो मग! या इकडं"...कसा काय वाटतो आमचा कट दिलेरंखान साहेबं तुम्हाला, मग! काय म्हणताय तुम्ही? मग! येऊ का तुमच्याकडं?
अहो! साधी गोष्ट आहे. एवढं पण आपल्याला कळायला नको. एवढचं नाही संभाजी परत आल्यावर शिवरायं त्यांना फ्रेन्चांशी वाटाघाटी करायचे अधिकार देतात. मोघलांच्या विरोधी आक्रमणाची जबाबदारी ते संभाजींवरच सोपवतात. त्यामुळे संभाजीराजे "स्वराज्यद्रोही" नाहीत हि वस्तुस्थिती आहे. हि खरी गोष्ट आहे. संभाजी राजांच्या चारित्र्यावरचे डाग सरळ सरळ आमच्या लक्षात येतात. काही अर्थ नाही त्यात. एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला बहाल केलायं. ज्यांनी "स्वराज्य-स्वराज्य" उभं केलयं.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Sunday, August 13, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०९

Image may contain: one or more people

आणखी काही आरोप केले गेले "संभाजी राजांवर". "संभाजी राजे" दीलेरंखानाला जाऊन मिळाले, संभाजीराजे फुटीर, छत्रपतींचा पुत्रं मोघलांना सामील......
नाही, "शिवाजीराजे" कर्नाटकच्या स्वारीवरं निघालेत, सगळं सैन्यं त्यांच्या सोबतं आहे. त्यावेळी बहादूरगडाला दीलेरंखान आलाय, तो स्वराज्यावरं आक्रमणं करायची भीती आहे. महाराजांनी "आदिलशाही" आणि "गोवळकोंड्यात" भांडणं लावून दिलीतं. त्यामुळे ते स्वराज्यावरं आक्रमणं करणारं नाहीतं. पण! दीलेरंखान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावरं दीलेरंखान आक्रमणं करू नये यासाठी त्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी "संभाजी राजांना" दिलीये. त्यांना "शृंगारपुरचं" सुभेदारं म्हणून नेमलंय. आणि ससैन्यं शिवरायं बाहेरं असताना निव्वळं बुद्धीच्या बळावरं "संभाजी राजांनी" दीलेरंखानाला रोखलंय,राजे येईपर्यंत रोखलंय. आणि त्यावेळी पत्रंव्यवहारं केलायं..."आम्हाला पराक्रमाची संधी हवीयं, आम्हाला आमचा पराक्रमं दाखवायचायं, इथं स्वराज्यातं ते शक्यं होईना, मला संधी द्यावी!!!". दीलेरंखानाने लगेचं उलट टपाली पत्रं पाठवलं..."अरे! तू तिथं गप्पं काय बसलायं? औरंगजेबाची इच्छा आहे सह्याद्री जिंकायची, तू ये चंल ये माझ्याकडं. आपण दोघं मिळून सगळा दख्खनं जिंकू". संभाजी राजांनी त्याला उलट टपाली कळवलं, "या राज्याची जबाबदारी मझ्यावरं सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहेत. ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारुं शकतं नाही". म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही असंही म्हणत नाही. निव्वळं झूलवतं ठेवलंय. राजे परत आले. पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली, बुत झालं आणि मग! राजे रायगडावर गेले. यताकाळं निरोप पाठवू सांगून मध्ये सहा-सात महिने गेले. आता संभाजीराजांना पळूनचं जायचं होतं तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं. आणि मग! एके दिवशी रायगडावरून राजाचं पत्रं येतयं. आपण रायगडास न येता परळीस जाने उचित. आणि मग! संभाजी राजे निघाले तिथून आता परळी म्हटंल कि पुन्हा " समर्थ रामदास स्वामींचा" उल्लेख आला. ""मग! संभाजी राजे बिघडलेले होते, त्यांना मार्गदर्शनाची गरजं होती म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थांकडे पाठवलं"". पण! त्या क्षणी समर्थ परळीच्या किल्ल्यावर हजरंच न्हवते आणि राजांना हे माहिती असंलचं पाहिजे,कानोकान खबरी असतात त्यांच्याकडं. मग! ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत त्याच काळात संभाजीना तिथं पाठवायचा उद्देश्य काय? आणि परळीपासून तेरा मैलावरं माहुलीला दीलेरंखानची लोकं आलीत तिथून अवघ्या तेरा मैलावरं जाऊन संभाजीराजे मोघलांना सामील झाले. हा सगळा परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजी राजांनी पाळूनच जावं यासाठी हे जाणीवपूर्वक केलेलं नियोजन आहे. कारण! वस्तूस्थिती ती आहे, शिवाजी राजे कर्नाटकावरून परत आलेत, सैन्यं थकलंय, शस्त्रं मोडलीत, दीलेरंखानाशी लगेच मुकाबला करू शकत नाही यासाठी आणखी काळं दीलेरंखानाला रोखनं गरजेचं आहे म्हणून शिवरायांनी संभाजी राजांना सांगितलंय....""जा त्यांच्याकडं रोखून धरा"" आणि हीच चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली आग्र्याच्या भेटीवरून परत आल्यावरं. औरंगजेब आता हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्रं पाठवलंय, "आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुम्हाला न सांगता आलो...असुद्या! आता माझा पुत्रं पुन्हा मनसबदारं म्हणून घ्या". आणि संभाजींना पुन्हा त्यांनी मुआजमकडं पाठवलंय आणि तेच याहीवेळी केलं संभाजींना त्यांनी पुन्हा दीलेरंखानाकडे पाठवलंय आणि जेवढा काळं संभाजी दीलेरंखानाकडे आहेत तेवढा काळं दीलेरंखानानं एकदाही स्वराज्यावरं हल्ला केला नाही. ""भूपाळगडाचा एकंच किस्सा पण! त्या भूपाळ गडाबद्दल संभाजी राजे बाकरे नावाच्या ब्राम्हणाला दानंपत्रात ते स्वतः लिहितात...."तो दीलेरं भूपाळगडाची इच्छा धरूनं माझ्यासमोरं आला त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्रं उभारूनं क्रोधं प्रकटं केला". म्हणजे सरळं आहे संभाजी राजांची इच्छा नाही स्वराज्यावरं आक्रमणं करायची. एवढी एकचं घटना". पण! तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय. संभाजीराजे जोपर्यंत दीलेरंखानाकडे आहेत तोपर्यंत दीलेरंखानाने स्वराज्यावरं आक्रमणं केलेलं नाही आणि संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही. पण! याच काळात शिवाजीराजे मात्रं मोघालांचे किल्ले घेत निघाले.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Saturday, August 12, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०८

Image may contain: one or more people and text

"संभाजी महाराज" व्यसनी असं रेखटलंय काहींनी. काही काही नाटकात तरं इंट्रीच ग्लास घेऊन दाखवली. अरे! कुठून लागला शोधं?
काफिखान तो औरंगजेबाच्या दरबारात होता अख्बारी. आपल्या सातारंला "ग्रांन्डफ" नावाचा इतिहासकार होता. त्याने मराठ्यांचा इतिहास लिहीला. आधार त्या काफिखानाचा घेतला. त्या काफिखानानं "संभाजी राजांच" वर्णन करताना लिहून ठेवलयं, ""तो संभाजी स्वतःच्या बळावरं, शौर्याच्या बळावरं एवढा बुलंद आणि बलाढ्य झालायं कि कुणी शत्रू त्याच्यावरं आक्रमणं करायला धजावेनाच...! जणू संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढलीए"" काय लिहीतोय तो? " संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावरं एवढा बुलंद आणि बलाढ्य झालायं कि कोणी शत्रू त्याच्यावरं आक्रमणं करायला धजावेनाच जणू काय त्याला सत्तेची नशा चढलीए" याचंच भाषांतर "ग्रांन्डफ" नि इंग्रजीत केलंय "सत्तेची नशा चढलेला राजा"......"Antoxited With The Wine Of Volian Pride" भाषांतर अगदी बरोबर आहे. पण! आमचं इंग्रजी उत्तमं आहे त्यामुळं आम्ही वाचलं. "Antoxited With The Wine Of Volian Pride"........"Antoxited With The Wine ??...Wine?? घेत होते संभाजी!!! लावला अनुमान.
एक पत्रं मिळालंय म्हणे, संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय!!!......"आम्हाला दारूची दोन पिंप द्या". एकजण म्हंटला "मागवला असेलं Stock" अरे! कायं???......अरे!!! मागवलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जरं तुम्हा लिहीणाऱ्या कळंत नसेल तरं तुम्ही लिहीताना घेतलेली का? याचं संशोधनं होणं गरजेचं आहे. सुपारीच्या खांडाचं व्यसनं नाही संभाजी राजाला......सुपारीच्या खांडाचं!!!...अरे!!! बत्तीस वर्ष झुंजत राहिलाय "छाव्यासारखा".
अजीबात नाही व्यसनी माणसाला नाही शक्यं होत. अरे! बेफाम अत्याचारं,अन्यायं सोसले. चाळीस दिवस औरंगजेबाच्या छावणीत!!! सहन होत नाही, शरीरंसंपदा तशी असावी लागते. आपल्या राजानं ती कमावलीये!!!...कमावलीये!!!. एकंही व्यसनं नाही त्याला एकंही.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Thursday, August 10, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०७

No automatic alt text available.

चित्रपटं काही बघितले आम्ही "थोरातांची कमळा", "मोहित्यांची मंजुळा" काय दाखवलं? "थोरातांच्या कमळा"मध्ये, "संभाजी राजे" या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात. तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा "आत्महत्या" करते. चित्रपटाच्या शेवटी ती समाधी सुद्धा दाखवली आहे. पण! निवेदन आहे, हि त्या थोरातांच्या कमळाची समाधी निदान त्याच्यावरं काय लिहीलंय ते बघावं तरी! काय लिहीलंय ते वाचलं आश्चर्याचा धक्का बसला......!!! थोरातांच्या कमळाचं निधन पावल्याचं सालं होतं "१६९८ सालं" आणि संभाजी राजाचं निधन झालायं "१६८९ साली" म्हणजे संभाजी राजांच्या मृत्युनंतर नऊ वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग! तीच्यावरं जबरदस्ती करायला "संभाजी राजांच" भूत गेलं होत का?
अजूनही प्रश्नं नाही पडला आम्हाला. ३५० वर्षे झाली उघड्या डोळ्यांनी आमच्या राजाची बदनामी बघत बसतो आम्ही उघड्या डोळ्यांनी. अरे! शिव छत्रपतींचा पुत्रं आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी पाठवली त्या त्या राजाचा पुत्रं आहे. अरे! तत्कालीन काळात कईक स्त्रियांचा राणीवास असणं काही गैरं न्हवतं, ना कक्षाळा ठेवणं समाज संमत होतं. किती आहेत संभाजी राजांच्या चरित्रात, दोन नावं आढळतात "दुर्गाबाई" त्याही कैदेत आणि राहिल्या फक्तं "येसूबाई"..."स्त्री सखी राज्ञी जयती" महाराणी येसूबाई यांच्याशिवाय चरित्रातं नावं आढळत नाही कुणाचं. का? स्वतः संभाजी राजांनी राजारामाची तीन लग्नं केली, संभाजी राजांनी सहा तरी करावी.
अरे! तो अकबरं औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजींची मदत मागायला आणि त्याला मैत्रीचं प्रतीकं म्हणून संभाजी राजांनी "मोत्याचा कंठा" भेट म्हणून दिला. आणि या नादान अकबरानं तो "मोत्याचा कंठा" एका नर्तकीला भेट म्हणून दिला. संभाजी राजांना हि वार्ता कळली आणि धाडदिशी कडाडले संभाजी राजे, "ज्याला मैत्रीची कदरं नाही त्याच्याशी कसंलही पत्रं आम्हाला जोडायचं नाही, फिल्तोर सवलती बंद करा...!" का? तरं मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला.
एवढी साधी गोष्ट ज्या "सर्जा संभाजी राजाला" सहन होत नाही तो चारित्र्याच्या बाबतीतं कसा असेल. बाजार गप्पा आहेत सगळ्या बाजार गप्पा...!!!

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..


शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Wednesday, August 9, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०६

Image may contain: 1 person, indoor

यताकाल संभाजी राजाचं वयं होतं सतरा वर्ष. महाराष्ट्र एका नव्या जाणीवेच्या आनंदाला आतुरं झाला. रायगड आनंदानं न्हाला होता. कारण होतं "शिवरायांचा राज्याभिषेक". साडेसातशे वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे "छत्रपती" होणारं होते. "या म्लेंच्छ बादशाहीमध्ये एक 'मराठा' एवढा पातशहा झाला" हि गोष्ट काही साधी झाली नाही. असं सभासदांनी लिहून ठेवलं. तो देखणा सोहळा शिवरायं "छत्रपती" होणारं. पण! त्याचं वेळी काहींनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावरंच आक्षेप घेतला. शिवरायं क्षत्रीयं नाहीत. सबब! त्यांना राज्याभिषेकाचा अधिकारं नाही. यताकाल "गागाभट्ट" काशीवरून येते झाले आणि त्यांच्या सामोरं बसले. "धर्मपंडित" संभाजी राजेंनी "गागाभट्टाना" पटवून दिलं. गागाभट्टानी संमती दर्शवली आणि रायगडावर राज्याभिषेक झाला. साडेसातशे वर्षापूर्वीचा अंधार हटवला, लोकंशाही राज्यं निर्माण झालं, लोकंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवंकल्याणकारी राज्यं निर्माण झालं, शिवशाही अवतरली. रयतेच्या डोळ्यांच्या कडा आनंदानं पाणावल्या. राजा "छत्रपती" झाला. पण! त्याचवेळी इतिहासात आणखी एक घटना घडली, आत्तापर्यंत मराठ्यांची पोरं फक्तं सरदारं पुत्रं होती. "संभाजी राजे पहिले 'छत्रपती' पुत्रं ठरले", "संभाजी राजे पहिले 'युवराज' झाले.
या घटनेपर्यंत संभाजी राजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही. पण! या घटनेनंतर संभाजी राजांच्या चारित्र्याचं पाणी असं काही वेगळ्या पाटेनं वळवून देण्यात आलं कि, मुळचा "संभाजी राजाच" हरवून गेला. 'मल्हारं रामराव चिटणीस' या बखरकारानं आपल्या खापरं पंजोबाला संभाजीनी हत्तीच्या पायी दिलं याचा राग मनात घेऊन "संभाजी राजांचं" अत्यंत विकृत चित्रणं केलं. सभासद बाखरानही तसंच केलं. या दोन बखरींचा आधार घेऊनच मग! पुढचं लेखन झालं आणि "संभाजी राजा" बदनाम होत राहिला. संभाजी राजांवर आत्तापर्यंत ६० नाटकं, आणि २७ चित्रपटं आले. खुद्द दस्तूरं खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढे झाले नाहीत. आम्हाला चकचकीत जगण्याची सवयं लागलीये. चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कादंबरीकारांनी, संभाजी राजाचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते अधिक चकचकीत करण्याचा प्रयत्नं केला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशी काय पात्रं आणली गेली "मोरेश्वरं आत्माराम पठारे" यांनी संभाजीवर पाहिलं नाटकं लिहिलं. या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्रं आणलं हीच तुळसा बेबंदशाही मध्ये औंधकरांनी आणली पण! नाटकाच्या प्रस्थावनेमध्ये औंधकर असं लिहितात कि या नाटकात योजलेलं "तुळसा" नावाचं पात्रं पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. पण! तीन तास नाटकं बघताना आम्हाला प्रस्थावना वाचून दाखवली जात नाही, "तुळसा" खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागतं नाही. पण! तीन तास नाटकात संभाजीबरोबर तुळसा दिसते आणि मग! नाटक संपल्यावर आम्ही म्हणतो, "एवढे आता दोघं तीन तास होते बरोबर म्हटंल्यावर असणार काहीतरी दोघांच.".....उगं दाखवत्यात काय!!!
सत्याच्या तळाशी, वास्तवाच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि मग एखादं "नाहक व्यक्तीमत्वं" बदनाम होत राहतं हि आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Tuesday, August 8, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०५

No automatic alt text available.

"संभाजी राजांचं" वयं झालं दहा वर्ष. त्याचवेळी शिवाजीराजांनी संभाजी राजांना विचारलं, "संभाजी राजे आपण लेखणी तेज चालवता पण! आपली तलवारं?" अरे! उसळला छावा......"आज्ञा द्यावी आबासाहेब!!!" आणि आज्ञा दिली गुजरात खंबायप्रांत टिपण्याची आणि दहा हजाराची फौज घेऊनं बछड निघालं. दावेचा लोट काळ्या कबिनं धाकानं उरातं घ्यावा तसा शौर्याचा लोट घेऊन निघाला. कोसळला गुजरातवरं खंबाय टिपलं, बागानगर लुटलं, मामे जाधवरावं खासे कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहरं स्वराज्यावरं उमटवली आणि त्यांच्या युद्धनीतीनं अनेकांच्या नजरा विस्पारून गेल्या. शिवरायांना बातमी कळाली आणि कडाडले शिवराय..."द्या बत्ती तोफांना, आमचा बछडा जीत घेऊन रायगड जवळं करतोय!" आणि स्वराज्यावरं संभाजींचा पहिला पराक्रमं उमटला.
लेखणीच्या, बुद्धीच्याचं बळावरं न्हवे तरं मनगटांच्या परीक्षेत सुद्धा संभाजी राजे अव्वलं आले. यताकाल जिजाऊ माँसाहेबांनी मुलखी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजी राजांवर सोपवल्या. दानंप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी यायच्या त्याचं निराकनं करण्याची जबाबदारी सुद्धा संभाजी राजांवर सोपविली. एवढचं न्हवे धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे ते सगळे खटले शिवराय आता "धर्मपंडित" असणाऱ्या संभाजी राजांच्या न्यायासनापुढं चालवायला देऊ लागले आणि संभाजी राजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रियं होऊ लागले. "न्यायकठोरं संभाजी" म्हणून संभाजींची लोकप्रियताही वाढली. जनतेच्या कल्याणाचं सूत्रं संभाजी राजांनी आपल्या काळजात जपलं कारणं! शिवरायांनी दिला होता महामंत्र,""रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो...एकवेळ शत्रूनं पराभव केला तरी चालेल पण! रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये""
आणि संभाजीराजे त्याचं शिवरायांच्या पाऊलावर पाऊल टाकून रयत जपत होते. अगदी मार्दवतेनं, पोटच्या लेकासारखे.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Monday, August 7, 2017

शंभू चरित्रं भाग :- ०४

Image may contain: 1 person

औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून "शिवराय" औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले न्हवते.पण! शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून "संभाजीराजे" मात्रं औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानी संभाजी राजांना विचारलं, "राजे!!! आपण उत्तमं मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे. आपण उत्तमं कुस्ती खेळता असाही आम्ही ऐकलयं. मगं! संभाजी राजे!!! आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत. आमच्या दरबारातल्या एखाद्या माल्लाशी कुस्ती खेळल का? तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला...." आम्ही फक्तं आमच्या लायकीच्या माल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही...सबब!!!"
हे महाराष्ट्राचं पाणी होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राजांनी वयाच्या नवव्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला. पण! बघता बघता औरंगजेबाची मुठी आवळत गेली, शिवरायांचा गळा गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही. पण! संभाजीराजे मात्रं औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वड्यापर्यंत बिंदोख येत जात होते. या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपविल्या आणि महालापासून कुंभाराच्या वड्यापर्यंत सगळी चाल संभाजी राजानं व्यवस्थित पेरली. आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नांतही शक्यं होणारं नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि "महाराष्ट्राचा नरंसिंह" सुटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला.
पण! आपला एकुलता एक पोरं "संभाजी" त्याला मागं ठेवून त्यावेळी एका पित्याचं काळीज गलबलंल नसेल का? जीव व्याकुळला नसेल का? अरे! नऊ वर्ष उमरीच पोरं कसं ठेवावं मागं, मृत्युच्या दारात, औरंगजेबाच्या दरबारात अरे!!! कसं ठेवावं. जरं जातेवेळी त्या संभाजी राजानं विचारलं असतं शिवरायांना, "आबासाहेब..आम्हाला सोडून एकटेचं जाणार?" अरे! तरी हा सुद्धा हटला असता मागं, धरणी कंपच झाला असता, फाटला असता बांध जरं विचारलं असतं संभाजीनी "आबासाहेब आम्हाला सोडून एकटेचं जाणार!!!". पण त्यावेळी हा "सर्जा संभाजी राजा" आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, "आबासाहेब..आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे" आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेवरं हा "नरंसिंह" खुश झाला. यताकाल राजे निसटले आणि राजगडावर पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी वार्ता उठवली "वाटेत संभाजी राजांचं निधनं झालं". वयाच्या नवव्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावरं मरणा निधड्या छातीनं सामोरं जायीपर्यंत ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं. पण! शिवरायांनी उठवली होती हुलं. राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले. येसूबाई सती जायला निघाल्या. जिजाऊ तरं रडून रडून थकल्या पण! सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजी राजे सुखरूप गडावर येत नाहीत. हुलं उठवली एवढ्यासाठी कि संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजी राजे गडावर येतील आणि झालं तसचं संभाजी राजे सुरक्षित गडावर पोहोचले पण गेलेला शंभूराजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजी राजा वेगळा होता. परत आला होता "धाकंला धनी","जाणता","परीपक्वं झालेला","मोघली रियासतीचा","राजकारणाचा" अभ्यास करून तयार झालेला......"संभाजी राजा"

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Sunday, August 6, 2017

शंभू चरित्र भाग :- ०३

Image may contain: drawing

संभाजी राजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही. बघता बघता संभाजींच्या या कर्तुत्व गुणांनी "स्वराज्य" मोहरत निघालं. संभाजी राजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजी राजांचा जन्मं झाला आणि स्वराज्य वाढत-वाढत निघालं. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकले प्रमाणं स्वराज्य संवर्धीत होत गेलं. बघता बघता साडे आठ वर्षाचे झाले संभाजी राजे. त्याचवेळी महाराष्ट्रावर "मिरझाराजे जयसिंगच" आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईलाजानं तह करावा लागला. पुरंदरंसह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मीरझा म्हणाला.."राजे! आपले पुत्रं संभाजी राजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील..." नरसिंह व्याकुळला.."नाही राजे, हे राजकारणं नव्हे!" आणि मीरझा हसतं म्हणाला,"राजे! हे राजकारणंच आहे" आणि वयाच्या साडे आठव्या वर्षी संभाजी मोघालांकडे ओलीस म्हणून राहिले. आणि त्याचवेळी संभाजींचा राजकारण प्रवेश झाला. यताकाल शिवरायांनी मनसबी पत्करल्या, औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर संभाजी राजांना सप्त हजारी मनसबदार केलं. पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कळून चुकलं होतं "पित्यापेक्षा पुत्रं सवाईचं निपजणारं आहे". त्याचवेळी औरंगजेबाचा खलिता आला, "शिवरायांना आग्र्यास बोलावलयं सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजानाही न्यायचय". एका पित्याचं काळीज व्याकूळलं, अरे! नऊ वर्षाचं पोरं आहे,इवलासा पोरं आहे, कसं न्यावं त्याला. या मुलुखापासून त्या मुलुखापर्यंत वैराण वनवास भोगेल का त्याला? अरे! ऊन, वारा, वादळं, पाऊसं या प्रवासात कसा टिकेल? कसा जगेल? मग! त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं, अरे! संभाजी म्हणजे एकतरं शिवाजीच्या पोटाला आलेला पोरं नाही, "तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोरं आहे". ते धैर्य ते शौर्य त्याच्यातही आहेच. आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. या मुलूखापासून आग्रा मथुरेपर्यंतच्या मुलूखापर्यंतचा सगळा प्रवास संभाजी राजांनी लीलयात झेलला. "राजे" आणि "संभाजी राजे" औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. पण! इथचं औरंगजेबाने गहरी चाल खेळली. शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा "नरंसिंह" खवळला आणि बघता बघता बाणेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला. सगळा दरबार कापतं राहिला. एवढा-एवढा-एवढा स्वाभिमान अरे! आत्तापर्यंत दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली न्हवती, असा अपमान कधी घडला न्हवता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकारावं,उभा दरबार थरं- थरं कापतं होता. अरे!!! चुकूनं जरं शिवरायांकडे तलवार असती ना त्यावेळी तरं तिथंच औरंगजेबाचा यदाकदाचित शिरंच्छेद सुद्धा झाला असता. मोघलांच्या दरबारात जाऊन मोघलांची दाणादाण शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले. औरंगजेबाने समझौतीचा प्रयत्नं केला पण! राजा बदला नाही आणि त्याच वेळी औरंगजेबानं जहरी चाल खेळली.
शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरवात केली. शिवरायांना कळून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं कि, सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावरं नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावरं सुद्धा खेळाव्या लागतात. "तलवारीच्या पात्याला एकदा का बुद्धीची धारं चिकटली कि मगं शौर्य लखलखतं आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली.

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Friday, August 4, 2017

शंभू चरित्र भाग :- ०२

Image may contain: 1 person, sitting

ज्यावेळी कोणा एखाद्या गावरान माणसाला प्रश्नं विचारला जातो..."संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहितीये का?" तो दोन शब्दांत उत्तरं देतो. "संभाजी महाराज रगेल होते" आणि "संभाजी महाराज रंगेल होते". दोन शब्दांत "संभाजी राजांचा" इतिहास बदलून जातो. इतिहासानं ना-ना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावरं. "संभाजी स्वर्याचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल, संभाजी राजाने मराठेशाही बुडवली, संभाजी राजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तख्तनंशील वारीस, संभाजी राजे म्हणजे स्वराज्यद्रोही, संभाजी राजे म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन मिळालेले, संभाजी राजे म्हणजे छत्रपतींचे पुत्रं असूनं युवराज असूनं मोघलांना सामील झालेले". ना-ना, ना-ना, ना-ना आरोपांच्या फायरी झाडल्या. बदनाम होत राहिला "संभाजी" गेली ३५० वर्ष. काय वस्तूस्थिती? काय खरा इतिहास?
इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावे पाहतो, त्यावेळी लक्षात येतं १४ मे १६५७ पुरंदरवरं एका "शिवरत्नाचा" जन्मं झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून "माँसाहेब" जिजाऊनी त्यांचं नामकरणं केलं. बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सर्वांची मनं हरपू लागली. वय झाल सव्वा दोन वर्ष आणि त्याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजी राजांच्या "मातोश्री सईबाई महाराणी साहेब" यांचं निधनं झालं. दहिवरचं मातृत्वाचं छत्रं हरपलं. पिता "शिवाजी राजे" तर सतत पाठीला मरण बांधून मुलुखभर दौड घेणारे,पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? पण! याचवेळी सामन्याला "माँसाहेब" जिजाऊ. अजून दुसरा "शिवाजी" घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापिठामध्ये "संभाजी" राजांचं शिक्षण चालू झालं. संभाजी राजे "लिहिणं-वाचणं शिकले", "चालणं-बोलणं शिकले", "पळणं-खेळणं शिकले". बघता बघता ना-ना कला, ना-ना विद्या, ना-ना गुण त्यांना आत्मसाद झाले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही तब्बल सोळा-सोळा भाषा संभाजी राजांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते, तामिळ येते, मल्ल्याळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजी राजांना येतेय.
राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले. काव्यगुण सुद्धा त्यांनी जोपासला. संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषणम्" नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. या "बुधभूषणम्" नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे "श्री गणेशाचं" वर्णन करताना लिहितात,
"पदपदम् पत्रं समचरणंजंग जिमीकलक् कलवकर् ....!!!
नाभीलालित् कबीरउदरलंबित विशालंवर् ....!!!
वरंदिर्घतिमुण्डी करंदेत् चारीफ़ल्....!!!
एकदन्तरुसुण्ड् लवतरिजत् सकलंमल्....!!!"
हे संभाजी राजांनी संस्कृत मधून "श्री गणेशाचं" केलेलं वर्णन आहे. 'नकशिका', 'नायिकाभेद', 'सातसतर्क' यांसारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. आणि बघता बघता उत्तमं कवी म्हणून "संभाजी राजांचा" नावलौकिक झाला. बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच पण! त्याचवेळी शरीराचं, शरीरंसंपदेचं, हा संभाजी ना-ना विद्यामध्ये, व्यायामामध्ये तेज तरबेज झाला. "मल्लविद्या", "भालाफेक", "तलवारबाजी", "घोडेस्वारी" याच्यामध्ये संभाजी राजांनी मोठी हुकुमत पैदा केली. अरे! घोडेस्वारीमध्ये संभाजी राजांचा हात कोणी धरतं न्हवतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्रदिशी डोळ्याची पापणी मिटते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकचं योध्दा झाला. त्या योद्ध्याचं नाव होतं....""संभाजी""

क्रमशः

पुढील भागांसाठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि Suscribe करा..

शंभू महाराजांचे चरित्र ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


Tuesday, August 1, 2017

शंभू चरित्र भाग:- ०१

No automatic alt text available.

(सूचना:- "धर्मपंडित श्री छत्रपती संभाजी महाराज" यांचे चारित्र्य "प्राध्यापक माननीय श्री नितीन बानुगडे पाटील" यांचा व्याख्यानाच्या शब्दानिधीतून रेखाटण्याचा माझा प्रयत्न आहे. "संभाजी राजांचा" खरा इतिहास सर्वाना कळवा यासाठीचा माझा लेखन प्रपंच आहे. आजपासून ते शंभू राजांच्या बलिदान दिनापर्यंत "श्री शंभू चारित्र्य" या "भगवं वादळं" च्या माध्यमातून सर्वासमोर येईल तरी सर्वांनी वाचावे हि विनंती. खूप मोठं आहे वेळ नाही वाचायला असे बोलून कोणीही टाळाटाळ करू नका. अरे! आपले "शंभू राजे" आभाळापेक्षा मोठे होते आणि त्यांचा पराक्रम जाणून घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे कृपया शेअर करा..अरे! कळूद्या संपूर्ण जगाला आपला "संभाजी राजा" कसा होता ते. शेअर करा!!! .)

"इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही" हाही एक इतिहास आहे.