शिवाजी महाराज


shivaji maharaj साठी प्रतिमा परिणाम

जन्म

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
कुटुंब

वडिल - शहाजीराजे

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

आई - जिजाबाई

जिजाबाई व बाल शिवाजी
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.

पत्नी

सईबाई निंबाळकर
सोयराबाई मॊहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगणाबाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड

वंशज

मुलगे

छत्रपती संभाजी भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले

मुली

अंबिकाबाई महाडीक
कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
दीपाबाई
राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
राणूबाई पाटकर
सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)

सुना

संभाजीच्या पत्नी येसूबाई
राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)
जानकीबाई
राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०)
अंबिकाबाई (सती गेली)
सगुणाबाई

नातवंडे

संभाजीचा मुलगा - शाहू
ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी
राजसबाईची मुले - दुसरा संभाजी

पतवंडे 

ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

मार्गदर्शक

लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.

मावळ प्रांत

मावळ

छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे

कान्होजी जेधे
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी देशपांडे
नेताजी पालकर
बाजी पासलकर
जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
तानाजी मालुसरे
हंबीरराव मोहिते

शिवाजी महाराजांचे सरसेनापती

नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
खंडेराव कदम

शिवरायांचे लढाऊ आयुष्य, गडकिल्ले, मावळे यांच्या विषयी माहिती आपल्याला या ब्लॉग च्या माध्यमातून दिली जाईल, त्या साठी आपल्या या ब्लॉग ला भेट द्या आणि आजच Suscribe करा, आणि हि पोस्ट तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा..

आपलं हे फेसबुक पेज सुद्धा लाईक करा - https://www.facebook.com/chatrapatishivajimaharajkijay/


आपल्या ब्लॉग वर प्रदर्शित होणारी माहिती ई-मेल द्वारे मिळवण्यासाठी या ब्लॉग ला Suscribe करा, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या, आणि Suscribe या बटनावर क्लिक करा..


No comments:

Post a Comment