Saturday, October 7, 2017

शंभू चरित्रं भाग :- १२

No automatic alt text available.

एके दिवशी "संभाजी राजांनी" सरलष्करांना विचारले, "मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण! औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे. जागा शोधा मौक्याची". आणि हंबीररावांनी जागा काढली अगदी मौक्याची..."राजं! एक जागा हाय "बुऱ्हाणपुरा दारंउक् मुल्खदख्खन". "बुऱ्हाणपुरा" म्हणजे औरंगजेबाची दख्खनेतील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावरं तीळं शोभावा असा "बुऱ्हाणपुरा" शोभतो. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य...अफाट! अन त्याच वेळी कडाडला छावा!..."मग, टाका छापा त्या बुऱ्हाणपुरावर, करा कोळसा पुरा त्याचा". अरे! सुटले मराठे, बुऱ्हाणपुराचे सतराचे सतरा पुरे धुतले. काही काही ठेवलं नाही. अरे! बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं "हळवं काळीज पानं". परं चेंदा-मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा सोसतो न सोसतो तोच संभाजी राजांनी दुसरा तडाखा दिला "औरंगाबाद". औरंगजेबाच्या नावानी बसवलेले "औरंगाबाद". संभाजी राजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं कि औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तरं पुढं स्मशानं दिसावं अशी अवस्था "औरंगाबाद"ची केली होती. औरंगजेब चरफडला, तरफडला भयाण वैतागला पण! त्याचवेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तूरं खुद्द औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा "अकबरं" औरंगजेबाच्या विरोधात उठला. आणि सरळ आला महाराष्ट्रात कारण! त्याला माहितीये, या पुऱ्या-पुऱ्या हिंदोस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकचं ""मर्द सर्जा"" आहे......""संभाजी""
तो आला सरळ संभाजी राजांकडचं. औरंगजेबाला दुसरं कोणी नमवू नाही शकत...औरंगजेबाला दुसरं कुणी झुकवू नाही शकत...औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत......एकचं ""संभाजी""

क्रमशः