राजं या कि पुन्हा जन्माला....राजं आई भवानीची आण हाय तुम्हास्नी.....एकदा तरी धाव घ्या कि आपल्या महाराष्ट्रावर.
राजं..राजं..म्या....म्या हाय कि तुमच्या संग , कायभी कराया तयार हाय….फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं म्या फितूर नाय व्हायचा राजं...राजं तुमच्या चरणाची आण घेतूया.....मग इथल्या दगडाशी भी खोट नाय बोलायचा.....राजं म्या लढीन त्या १२ मुल्काचा १८ पगड जातीचा मावळा होवुन...फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं जावू कि मग संग...किल्ले जंजिरास्नि जिंकाया...राजं म्या....म्या खेळीन कि रक्ताची रंगपंचमी , तुम्हास्नी कायभी नाय करू द्यायचा राजं , राजं हाय माझ्यात ताकद...पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या बनीन त्यो बाजी....जीवाची बाजी लाऊनि त्यानं तुम्हास्नी सुखरूप ठेवलं....राजं म्या लावीन कि माझी बाजी....फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं म्या बनीन त्यो दर्या सारंग...अशी जरब बसविण राजं महाराष्ट्रावर कि , समुद्राचं पाणी भी चळा चळा कापाया लागल..पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं...म्या , म्या होईन त्यो नूरखान बेग ज्यानं खरा धर्म ओळखीला राजं...राजं म्या एकटा भारी पडल राजं सर्वास्नी....फकस्त राजं तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो कान्होजी जेधे...नेहमी तुमचीच बाजू मांडाया...राजं मग अशी भी जरब बसविन शत्रूवर कि, पुन्हा महाराष्ट्रात यायचा नाही.....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो जिवाजी महाल....त्यो रांगड्या धडाचा , मदमस्त चालीचा अन अफाट ताकदीचा अस भी गनिमाला ठार करीन राजं कि त्यो पुन्हा नाव घ्यायचा नाय....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो बाजी प्रभू....जीवाची बाजी लावाया...असा भी रडविन त्या मृत्यूला कि त्यो लाख पस्तावीन...पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो बहिर्जी नाईक....जणू तुमचा तिसरा डोळाच...राजं असं भी शत्रूला फाडीन कि त्याला ठिगळ लावाया कुठभी जागा उरणार नाय...पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन कि त्यो मुरारबाजी....नंग्या तलवारी नाचविणारा ,मृत्यूला पळविणारा...अन वेळ प्रसंगी जीव भी देणारा....हो , हो....राज म्या होईन त्यो....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो....हिरोजी त्योच मदारी मेहतर.....तुम्हास्नी सुखरूप बाहेर काढाया खुद्द यमाच्या दरबारात उभा ठाकलेला....होय म्या करीन राजं तस , तुमच्या साठी कायभी करीन...पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं त्यो नाय का तान्हा....होय त्योच तान्हाजी...हा..हा..म्या होईन कि त्यो तान्हाजी....तुमचा सवंगडी....जो पोटच्या पोराच लगीन न लावता कोंढाण्याच लगीन लावाया गेला...तर त्यो पुन्हा घावलाच नाय...होय राजं म्या करीन तशी जिगरबाज झुंज...पण फकस्त तुम्हास्नी पुन्हा याव लागल राजं.
राजं म्या होईंन कि त्यो शेलाराम...८० वर्षाच ते रांगड शरीर तरुणास्नी लाजवणार...हो राजं म्या होईन कि त्यो...पण फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं म्या होईन कि त्यो सूर्याजी....आपल्या तान्हा चा भाऊ...ज्यानं जिगरीन सिंदगड जिंकला...होय राजं मला भी व्हायचं राजं तसं...जिगरीनं जीकाया जायचं राजं तसं....तुमच्यासाठी काहीतरी करायचंय राजं...पण फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं म्या होईन त्यो नेताजी....नेताजी पालकर....म्या होईन त्यो कडतोजी....जो आपल्या प्रतापान प्रतापराव झाला...अन तुमच्यावर लई प्रेम केलं...हो राजं म्या होईन, तुमची आण घेतूया राजं...पण फकस्त तुम्ही पुन्हा या राजं.
राजं म्या होईन त्यो सिद्धी हिलाल....जो वाऱ्यासारखा आला अन वेडात विर झाला...राज म्या होईन कि तसा...पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या .
राजं...राजं....म्या होईन....होय , म्या होईन त्यो हम्बीराव...ज्यानं अफजल्ल्याच्या वेळी ६०० गनिमांना नर्क दाखविला...होय राजं म्या होईन त्यो....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं म्या होईन त्यो हिरोजी....हिरोजी इंदलकर.....ज्यानं आपली जमीन विकून राजधानी बांधून काढलीया....होय राजं म्या होईन त्यो....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं , राजं म्या....म्या होईन कि त्यो...त्यो शिवा काशीद.....राजं त्यो जन्मला जरी शिवा काशीद असला तरी मरतांना मात्र शिवाजी महाराज म्हणून गेला.....हे भाग्य कोनलाभी लाभतं होय.....पण राजं म्या मरीन कि शिवाजी महाराज म्हणून....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
राजं...या कि , राजं पुन्हा त्या अफजल्ल्याला फाडू राजं...अन होय राजं त्या कृष्णाजीला असा भी उडवितो राजं , कि पुन्हा ३५० वर्ष जन्म घ्यायचा नाही त्यो.....राजं तुम्हास्नी काय भी नाय करू द्यायचा म्या....पण राजं फकस्त तुम्ही पुन्हा या.
अन होय राजं त्यो औरंग्या राहिलाच कि.....या राजं , इतका फाडू राजं औरंग्याला इतका फाडू कि त्याला ठिगळ लावाया जागाच नाय उरायची.....राजं आपल्या शंभू राजांची पुरी तहान भागवू इतका फाडू राजं.....पण फकस्त राजं तुम्ही पुन्हा या.
मग राजं येताय नव्ह म्या होईन ना राजं त्यो १२ मुल्काचा....१८ पगड जातीचा मावळा...राजं तुम्हास्नी आई भवानीची आण हाय....तुम्हास्नी यावच लागल....म्या केविलवाण्या नजरेन तुमची वाट पहातुया....राजं या मग लवकर....म्या हायच तुमच्या संग...!!
!! ध्यानी मनी स्वराज्य संकल्पक सरलष्कर महाराजा शहाजीराजे !! राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब !! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !! मृत्युंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !!
!! जय भवानी !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
!! हर हर महादेव !!

No comments:
Post a Comment